पूर्ती नियतकालिकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुरस्काराची मोहोर


श्रीरामपूर :

येथील रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेजच्या 2018-19मध्ये प्रकाशित झालेल्या पूर्ती या नियतकालिकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा अव्यावसायिक गटात अहमदनगर विभागाचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला. संपादक मंडळाच्या वतीने हा पुरस्कार हिंदी विभाग प्रमुख डॉ.अनुप दळवी व मराठी विभागातील संतोष  पवार यांनी स्वीकारला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाद्वारे महाविद्यालयीन व विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी किंवा विद्यार्थी संघ वेगवेगळ्या स्पर्धांसाठी नियोजित कार्यक्रमानुसार पाठविले जातात. 

इंद्रधनुष्य राज्यस्तरीय, पश्चिम विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा युवक महोत्सवातील विजेते व अशा विविध उपक्रमांसह स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या स्पर्धक विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी कार्यक्रमात यथोचित गौरव केला जातो. महाविद्यालयीन पातळीवर दरवर्षी प्रकाशित होणार्‍या नियतकालिकांचे मुल्यांकन करून, त्यांना विभागीय व विद्यापीठस्तरावर गौरवले जाते. महाविद्यालय वा विविध स्तरावर विद्यार्थी विकास मंडळाचे विविध उपक्रम यशस्वीरित्या व नाविन्यपूर्णतने राबवल्याबद्दल महाविद्यालयीन पातळीवर नेमलेल्या उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकार्‍यांना गौरवण्यात येते. याबरोबरच असे उपक्रम नाविन्यपूर्णतेने व पूर्णक्षमतेने राबवणार्‍या महाविद्यालयांचा व परिसंस्थांचाही सन्मानपूर्वक गौरव केला जातो.

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कॉन्सिल सदस्या, श्रीरामपूर रयत संकुल अध्यक्षा मीनाताई जगधने, प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी तत्कालीन संपादक मंडळाचे अभिनंदन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या