भुईकोट किल्लातील जॉगिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी


नगर प्रतिनिधी

अहमदनगरच्या भुईकोट किल्ला येथील जॉगिंग ट्रॅक कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले होते गेल्या दीड वर्षापासून बंद आहे परंतु आता महाराष्ट्र शासनाने कोरोणा विषयक निर्बंध मोठ्या प्रमाणावर शिथिल केले आहे शहरवासीयांच्या शारीरिक आरोग्यासाठी भुईकोट किल्ला येथील जॉगिंग ट्रॅक सर्वोत्तम ठिकाण आहे या ठिकाणी युवक वर्ग खेळाडू व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येथे जॉगिंग करण्यासाठी येत असतात कोरोनामुळे सर्व नियम शिथिल करून सर्व ठिकाणे चालू करण्यात आले आहेत. परंतु अद्यापही हा जॉगिंग ट्रॅक चालू करण्यात आलेला नाही. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक पुरवत सुरू करण्याच्या मागणीसाठी पीस फाउंडेशन च्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देताना पीस फाउंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक अर्शद शेख समवेत बहीरनाथ वाकळे, प्रा. सय्यद महबूब, सय्यद सलीम सहारा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना म्हणाले की  सदरील जॉगिंग ट्रॅक तात्काळ सुरू करून नागरिकांच्या शारीरिक आरोग्याचा मार्ग प्रशस्त करावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या