आघाडी सरकार हे पांढऱ्या पायाचे : आ. पडळकर


दौंड 

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे अनैसर्गिक व पांढऱ्या पायाचे सरकार असून हे सरकार आल्या पासून संकटाची मालिका सुरू झाली.  हे अपयशी सरकार केव्हाही पडेल. असा घणाघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी भांडगाव येथे जाहीर कार्यक्रमात बोलताना केला आहे.

भांडगाव ( ता, दौंड ) येथील भांडगाव ग्रामविकास प्रतिष्ठान यांचे वतीने दौंडचे आमदार राहुल कुल यांचे वाढदिवसा निमित्त सत्कार समारंभ आयोजित केला होता.

पडळकर पुढे म्हणाले, हे सरकार फक्त खात आहे, सर्वसंन्याच्या अडचणी व प्रश्न याची त्यांना जाणीव नाही. आमदार राहुल कुल हे विधान सभेत जाऊ नये, यासाठी बारामतीकर भगीरथ प्रयत्न करतात. परंतु दौंडची जनता बारामतीकर यांना न जुमानता कुल यांनाच निवडून देतात, मी त्यांचे अभिनंदन करतो. 

आमदार राहुल कुल आपल्या भाषणात म्हणाले, दौंडचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत, अजूनही काही प्रश्न बाकी आहेत, दौंडच्या शेतीचा पाणी प्रश्न आणि बंद भीमा कारखाना सुरू व्हावा, हे दोन महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे, यामध्ये निश्चितच यश मिळेल. 

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्या भाषणात म्हणाले, कुल आणि पाटील घराण्याचे जुने रणानु सम्बध आहेत, ते आजही टिकून आहेत, आमदार कुल हे सतत जनतेच्याया प्रश्नांचीसोडवणूक करण्यात व्यस्त असतात. कोरोना काळात त्यांनी मोलाची कामगीरी केली आहे. म्हणून जनतेने त्यांना आरोग्य दूत ही पदवी दिली आहे.

यावेळी खासदार रंजितसिह मोहिते पाटील यांचेही भाषण झाले.

यावेळी स्वातंत्र्याचे 75 वी निमित्त स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, कोरोना काळात काम केलेले डॉक्टर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार, तसेच गोर गरीब जनतेस दिवाळी किट वाटण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन कुल, विकास शेलार, माऊली ताकवणे, लक्षीमन दादा काटकर, रामदास दोरगे, प्रतिष्ठानचे आयोजक विजय दोरगे, प्रमोद दोरगे, राजेंद्र जाधव, संदीप दोरगे, यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या