आमदार चषक स्पर्धेत साई बालाजी प्रथम तर टाकळीढोकेश्वर द्वितीय


लोणी : 

जिल्हासह संपुर्ण राज्यात मोठी लोणी येथील प्रतिष्ठा प्राप्त आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत साईबालाजी क्रिकेट क्लब अहमदनगरने प्रथम तर पारनेर येथील टाकळी ढोकेश्वर क्रिकेट स्पर्धेने द्वितीय क्रमांक मिळाला. 

खा. डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या आमदार राधाकृष्ण विखे पाटील चषक या स्पर्धेत जिल्हातील दोनशे संघानी सहभाग घेतला. प्रेक्षक गॅलरी, विनोदी आणि हायटेक सामान्याचे समालोचन, अचूक निर्मयक्षम पंच, स्वच्छ पाणी, ग्राऊंडची भव्य देख भाल, पार्किंग सुविधा, आरोग्य सुविधासह लोणी येथील पद्मभुषण खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रिडा संकुलचे मैदान सज्ज होते.

या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस १ लाख रुपये हे साई बालाजी क्रिकेटक्लब, अहमदनगर तर द्वितीय बक्षीस ७१ हजारांचे पारनेर येथील टाकळीढोकेश्वर क्रिकेट क्लब, तृतीय ५१ हजारांचे अस्लम कुरेशी क्रिकेट क्लब,लोणी,  चतुर्थ रुपये ३१ हजारांचे राशिन क्रिकेट क्लब कर्जत, पाचवे रुपये२१ हजारांचे गांवकरी क्रिकेट क्लब, लोणी तर सहावे बक्षीस रुपये ११ हजारांचे धोत्रे क्रिकेट क्लब,कोपरगांव यांनी मिळविले.

याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्ये मालिकावीर किरण मोरे, गणेश साळवे. उत्कृष्ठ फलंदाज - गणेश ढोले राहुल म्हस्के, जमिल पठाण उत्कृष्ठ गोलंदाज सचिन अहीरे, संतोष उगले उत्कृष्ठ यष्टीरक्षक - अदीनाथ दहीफळे ,आकाश खैरे, प्रज्वल बिडवे, रवि शिंदे, संतोष कुदळे यांनी मिळविले.

खा.डाॅ.सुजय विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे आदीच्या उपस्थित बक्षिस वितरण झाले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पायरेन्स क्रिकेट क्लबचे 

डॉ राहुल विखे, लखन गव्हाणे, शैलेश आहेर, प्रा.अबजल पटेल आहेर, प्रा.अबजल  पटेल, प्रा.कुंडलिका वरखड, प्रा.प्रदिप दळे, राहुल काळे, हजारे, जयबजरंग मित्र मंडळ आणि खासदार डाॅ.सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या