कॉंग्रेस लोकांपर्यंत जाऊन महापालिकेत सत्ता मिळवेल : नाना पटोले


पुणे 

कॉंग्रेसने पुणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले, हे पुणेकरांना सांगण्याची गरज नाही. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष पुन्हा त्याच जोमाने लोकांपर्यंत जाऊन महापालिकेत सत्ता मिळवेल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्‍त केला.

वारजे येथे कॉंग्रेसचे हवेली ब्लॉक अध्यक्ष सचिन बराटे यांच्या निवासस्थानी पटोले आले होते, त्यावेळी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बराटे यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी सभापती कै. रामभाऊ बराटे यांचे कॉंगेसमध्ये मोठे योगदान आहे.

याविषयी ते भरभरून बोलले. यावेळी बराटे परिवारातील माऊली बराटे, बाळासाहेब बराटे, केदार बराटे, आबा जगताप, मोहन कलाटे यावेळी उपस्थित होते.कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. याविषयी पटोले म्हणाले की, आता त्यांना आपल्या घराची आठवण येत आहे. त्यामुळे भाजपचे घर खाली होणार आहे.

महापालिका निवडणुकीत नवीन पिढीला संधी देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. ज्येष्ठ व्यक्‍तीचे मार्गदर्शन आवश्‍यक राहील, 60 टक्के तरुणांना संधी मिळेल. परंतु, उमेदवाराचे विजयी होण्याचे किती मेरिट आहे. ते तपासले जाईल.

यावेळी आमदार संजय जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे, ऍड. अभय छाजेड, श्रीकृष्ण बराटे, सचिन साठे, कैलास कदम, विठ्ठल पाटील, सोनाली मारणे, लहू निवंगुणे, अवधूत मते, सुरेश मते, किशोर रायकर, वैशाली खाटपे, दत्तात्रय झंजे, बाबा खान, प्रभाकर भोरकडे आदी उपस्थित होते.

पक्षाची भूमिका स्पष्ट करताना पटोले यांनी सांगितले की, राजकीय मुद्‌द्‌यांवर वारंवार चर्चा केली जात नाही. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकित आम्ही कॉंग्रेसची भूमिका मांडली. त्याला जनतेने प्रतिसाद दिल्याने या पोटनिवडणुकीत जनतेने कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी केल्याने आमचा पक्ष महाविकास आघाडी सरकारमधील नंबर एकचा पक्ष झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या