श्रीकृष्ण गोशाळेत वीज रोहीत्र भेट


कासार पिंपळगाव

पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथील श्रीकृष्ण गो माता शाळेत समाजसेवक बाबासाहेब ढाकणे यांच्याकडून गो माता शाळेची अडचण लक्षात घेता २५ केव्हीचे रोहित्र  (डीपी) भेट म्हणून देण्यात आली आहे. अशी माहीती गो माता शाळेचे संस्थापक दिपक महाराज काळे यांनी सांगितले. गोमाता शाळेत गेल्या काही दिवसापासून वीजेचा प्रश्न गंभीर होता. गोमाता शाळेत सुमारे १५० भाकड गो माता आहेत.

तसेच रात्री अपरात्री वन्य प्राण्यांची भिती गोमाता जाणवत होती.कारण वीजेचे व्यवस्था गो माता शाळेत नव्हती.राञी कंदिल व दिवा बत्तीवर गो माता शाळा चालू होती.वीज नसल्याने दूरवरुन पाण्याची व्यवस्था करावी लागत होती.तसेच खूप दिवसापासून विजेचा प्रश्न गंभीर होता. आता रोहीत्र मिळाल्याने विजेचा प्रश्न सुटला आहे.

यांची दखल समाजसेवक ढाकणे यांनी गो माता शाळेला भेट देवून  घेतली. गो माता शाळेची अडचण लक्षात घेता २५ केव्हीचा वीज रोहीञ भेट म्हणून दिले. सामाजिक कार्य करताना कोणत्याही प्रकारची इच्छा न बाळगता चांगले काम करणे.गो माता शाळेत कोणत्याही प्रकारची सेवा ही ईश्वर सेवा आहे. तसेच गो माता शाळेत  सामाजिक कार्य केल्याने परमेश्वराची सेवा केल्याचे भाग्य लागते. असे समाजसेवक बाबासाहेब ढाकणे यांनी सांगितले. गोमाता शाळेला कोणत्याही प्रकारच्या  स्वरुपात दान करा. ईश्वर सेवा घडेल असे मत यावेळी संस्थापक दिपक महाराज काळे यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या