ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी


दौंड  

सभासद हितासाठी श्रीनाथ म्हसकोबा साखर कारखाना सातत्याने विविध उपक्रम राबवित आला असून याचा एक भाग म्हणून आत्ता उसावरील कीड नियंत्रण करण्यासाठी आत्ता ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रत्यक्षात सभासदाचे शेतावर करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना श्रीनाथ म्हसकोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले, यापूर्वी कार खान्या कडून सभासद हिताचे उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये उसाचे एकरी 100 टन उत्पादन उपक्रम, शेतकऱ्यांचे ऊस पीक व अन्य पिका बाबत अभ्यास वर्ग, घेण्यात आले आहेत. उसावर होणार लोकरी मावा यासाठी औषध फवारणे जिकरीचे व कष्टाचेचे होते. यासाठी आत्ता उसावरील किड नियंत्रण करण्यासाठी ड्रोन द्वारे औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.

याचा पहिला प्रयोग वडगाव बांडे येथील सरपंच श्रद्धा आत्माराम मेमाणे याच्या ऊस शेतावर करण्यात आला.

यावेळी बोलताना ऊस विकास अधिकारी राजेंद्र थोरात म्हणाले, ड्रोनद्वारे औषध फवारणी , सुक्ष्म विद्राव्य खते फवारणी, तसेच विविध कीटक नाशक औषधांची फवारणी सहज सुलभ व कमी श्रमात करण्यात येते.

या प्रसंगी कारखान्याचे स्वीकृत संचालक भिमाजी मेमाणे, सरपंच श्रद्धा मेमाणे, शेतकी अधिकारी एस, बी. टिळेकर , बापू हुलगुंडे, श्रीकांत सोनवणे, काकासाहेब कंद, परिसरातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या