........'ती' परंपरा रायरेश्वरावर सुरु


भोर 

       तालुक्यातील रायरेश्वर पठारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कायम स्मरण राहावे यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान भोर शाखेने रायरेश्वर पठारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दररोज नित्य नियमाने पुजन करण्याचा संकल्प केला आहे. 

       शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान भोर शाखेने मागील दोन महिन्यांपासून छत्रपतींचे नित्य पूजन चालू केले आहे.दररोज एक धारकरी सकाळी ६ ते ९ यावेळेत  डोक्यात पांढरी टोपी परिधान करून रायरेश्वरावरील महादेवाची पिंड, शिवरायांची मूर्ती तसेच देवीच्या मूर्तीस अभिषेक करून पुष्पहार अर्पण करीत आहे.आता पर्यंत तालुक्यातील विविध १५ गावातील धारकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.याशिवाय शहरातील चौपाटी येथे शिवाजी महाराज मूर्ती परिसरात शिववंदना तसेच दर अमावस्येला पनवेल येथील छत्रपती संभाजी महाराज मूर्ती आणि तालुक्यातील शिंद येथील बाजी प्रभू देशपांडे यांची मूर्तीचे पूजन करण्यासाठी भोरचे धारकरी जात आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे दैनंदीन पूजन करण्याची किल्ले रायगडावरील ३५ ते ४० वर्षावरील ही पूजन  परंपरा आता भोर तालुक्यात धारकऱ्यांनी चालू केल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या