कोल्हापुरात पाटील- महाडिक गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक



 कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे पारंपारिक विरोधक अमल महाडिक यांच्यात ही लढत होतं आहे. कोल्हापूरमध्ये आज सतेज पाटील-महाडिक गट आमने-सामने आले.विधान परिषद अर्ज छाननीनंतर महाडिक-पाटील गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पागंवलं आहे. आज झालेल्या घटनेमुळं या निवडणुकीचं वातावरण तापू लागल्याचं दिसून आलं आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या कोल्हापूर जागेसाठी काँग्रेसनं सतेज पाटील यांना संधी दिलीय. तर भाजपकडून अमल महाडिक यांनी उमेदवारी देण्यात आलीय. पारंपारिक विरोधक या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा आमनेसामने आले आहेत. परिणामी कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापलं आहे. अर्ज छाननीची प्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले. जमावबंदीचा आदेश झुगारून कार्यकर्त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या