रेशनचा तांदूळ विक्रीसाठी जाताना पकडला


श्रीगोंदा प्रतिनिधी 

तालुक्यातील पारगाव सुद्रीक या ठिकाणी रेशनचा तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी यांना मिळताच पोलिसांनी तात्काळ पारगाव या ठिकाणी जाऊन पाहिले असता टेम्पो मध्ये पांढऱ्या गोण्यामध्ये तांदूळ दिसला. त्यावर शंका घेत पोलिसांनी टेम्पो पोलीस ठाण्यात आणला. मात्र 18 तास उलटूनही अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथून मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना मिळणारे रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

त्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या टेम्पोमध्ये पांढऱ्या गोण्यामध्ये तांदूळ भरलेला दिसून आला. त्यावेळी तेथील टेम्पो चालक आणि घटनास्थळी असलेल्या ठिकाणाहून पळ काढला. त्यामुळे पोलिसांच्या मनात शंका उपस्थित झाली.

त्यामुळे पोलिसांनी टेम्पो पोलीस ठाण्यात आणला आणि तो तांदूळ रेशनचा तांदूळ आहे की नाही, याबाबत पोलिसांनी तहसील कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तो रेशनचा तांदूळ आहे की नाही हे सांगता येत नाही. मात्र तो नाही असेही सांगता येत नाही. कारण उत्पादन झाल्यावर रेशन आणि मार्केट मध्ये एकच प्रकारचा तांदूळ येतो. त्यामुळे याबाबत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा असेही तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी सांगितले. त्यामुळे तालुक्यात जर कोणाच्या रेशनबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असेही तहसीलदार यांनी सांगितले. मात्र 18 तास उलटूनही अद्यापही गुन्हा दाखल नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

गाडी सोडण्यासाठी आमदारांचा फोन ? 

श्रीगोंदा तालुक्यातील चोरीचा रेशन तांदूळ वाहतूक करताना पोलिसांनी टेम्पो पकडला असता त्या ठिकाणी मध्यरात्री प्रेमापोटी शेजारच्या आमदार महोदय यांनी गाडी सोडण्यासाठी फोन केला होता. मात्र पोलिसांनी त्यांचेही बोलणे कानामागे टाकत टेम्पो पोलीस ठाण्यात आणला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या