अमरावती दंगल : अनिल बोंडे यांच्यासह भाजप नेत्यांना अटक

१२ प्रमुख नेत्यांसह २ ते ३ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे


अमरावती

अमरावतीत बंदमध्ये सहभागी झालेले  माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, गटनेते तुषार भारती, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णीसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. भाजपाच्या १२ प्रमुख नेत्यांसह २ ते ३ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या अचलपूरसह तीवसा शहरासह अनेक भागांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे, असे आदेश उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी निर्गमित केले आहेत.

शुक्रवारी निघालेल्या मोर्चाला अमरावती शहरात गालबोट लागलं याच पार्श्वभूमीवर शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या व पाण्याचा फवारा मारून जमावाला पांगवले होते.

सध्या अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात रहावी याकरिता अचलपूर, परतवाडा, तीवसा, दर्यापूर, अंजनगाव धामणगाव चांदुर रेल्वे आदी शहरांमध्ये पोलीस पोलीस बंदोबस्तात सह संचारबंदी लागू करण्यात आली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची परिस्थिती सध्या व्यवस्थित असून नागरिकांना संचारबंदीतुन सुट देत दुकाने खुली करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या