वातावरणातील बदलांमुळे द्राक्षबागांचे नुकसान


भवानीनगर प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे सर्व बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळत नव्हता. त्यानंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे आणि पिकांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली.त्या पंचनाम्याचे पैसे अजून सरकारी तिजोरीत अडकले आहेत. एवढ्या सर्व संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने फळ पिके घेण्यास सुरुवात केली. परंतु आता मात्र या हवामानबदलामुळे द्राक्ष पिकांचे सर्वात जास्त नुकसान होत आहे.

सकाळी ढगाळ हवामान असते लगेच कधी ऊन पडते तर कधी सरी बरसतात. या निसर्गाच्या चक्रा पुढे मात्र द्राक्ष बागांना रोगाचा विळखा पडत आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कागद अंथरले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास जाऊ नये म्हणून औषध फवारणी करावी लागत आहे त्यामुळे नाहक  शेतकऱ्यांना द्राक्ष पिकावर जास्तीची औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक घणारे शेतकरी हतबल झाले आहेत.

एवढं करूनही पुढे द्राक्ष मालाला किती दर मिळतो याची शाश्वती नाही .या हवामानबदलामुळे द्राक्ष उत्पादन घेणारा शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या