शेतकऱ्यांना 11 लाखांचा भाव दिला नाही तर तीव्र आंदोलन : जाधवराव


दिवे  प्रतिनिधी    


पुरंदर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्ग या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी झेंडेवाडी ते पवारवाडी असे रस्त्याच्या बाजूच्या जमिनी संपादन करण्याविषयी यापूर्वी झालेल्या बैठकीत भूसंपादन अधिकाऱ्यांनी ११ लाख रुपये गुंठा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देणार होते. पण प्रत्यक्ष वाटपाच्या वेळी ही रक्कम साडेतीन ते पाच लाख रुपयापर्यंत थांबली. यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आज (१३ रोजी) शासनाला जाग यावी म्हणून रस्ता रोको केला.     
       काळेवाडी ( ता. पुरंदर ) येथे या बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी झेंडेवाडी ते पवारवाडी या परिसरातील बाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी भूसंपादन जिल्हाधिकारी यांनी आमच्या शेतकऱ्यांना ११ लाख रुपये गुंठा प्रमाणे भूसंपादनाची रक्कम देणार असल्याचे सांगितले होते. पण तसे न झाल्यामुळे आम्ही हे आंदोलन करीत आहोत. आज नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी  यांना दिव्याच्या उपसरपंच सुजाता जगदाळे व इतर महिला शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. 
        यावर लवकर तोडगा न निघाल्यास २० डिसेंबर रोजी सासवड येथील तहसील कचेरी येथे गुरेढोरे, बाधीत शेतकरी, लहान मुले व महिला यांच्यासह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांनी यावेळी दिला.
      यावेळी तात्या काळे, रमाकांत काळे, राजेंद्र काळे, संजय काळे, रेवन्नाथ जाधव, बाळासाहेब काळे, रमेश भापकर, विलास झेंडे, दत्ता काळे, संतोष काळे, दादासाहेब पवार, मुरलीधर जाधव, दिलीप काळे, गजानन जाधव, विलास झेंडे, राजेंद्र जाधव, तसेच १५० हून अधिक बाधीत शेतकरी उपस्थित होते.
          यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, दिव्याच्या उपसरपंच सुजाता जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य गुलाब झेंडे, रुपेश राऊत तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य संगीता काळे, अविनाश झेंडे, अजित गोळे, रामभाऊ काळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या