ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतीत 1 जानेवारीपासून होणार बदल




मुंबई : मागच्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नं मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यानुसार व्यापार्‍यांना त्यांच्या स्तरावर ग्राहकांचे कार्ड डिटेल्स जतन करण्यापासून प्रतिबंधित केलं. हे नियम 1 जानेवारी 2022पासून लागू होतील. ऑनलाइन शॉपिंग  सुरक्षित करण्यासाठी हे नियम करण्यात आलेत. सप्टेंबरमध्ये आरबीआयनं कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती.

नवीन नियमांनुसार, ग्राहकांना प्रत्येक वेळी कोणत्याही वेबसाइटवरून चेकआउट करताना त्यांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स टाकावे लागतील, कारण ते डिटेल्स या प्लॅटफॉर्मवर सेव्ह केले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यवहारात कार्ड डिटेल्स टाकण्याचा त्रास टाळण्याचा मार्ग टोकनद्वारे सोडवला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या