शहर विकासासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचेकडून 5 कोटिंचा निधी


दौंड  :


दौंड शहराच्या सर्वांगीण विकास व नागरिकांच्या मूलभूत सोइ - सुविधांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडून 5 कोटी निधी मिळायची माहिती बादशहाभाई शेख यांनी दिली आहे. नगर पालिका वैशिष्टय पूर्ण योजने अंतर्गत 2 कोटी 75 लाख आणि व विशेष रस्ता अनुदान योजनेतून 2 कोटी 25 लाख रुपेउपलब्ध करून देण्यात आला आहे,
दौंड शहराच्या विविध विकास कामे आणि नागरिकांच्या मूलभूत सोई - सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर पालिकेतील विरोधी गट नेते आणि त्यांचे सहकारी भरीव निधी मिळावा यासाठी माजी आमदार रमेश थोरात आणि जेष्ठ जि,प, सदस्य बाबा जगदाळे यांचेकडे सातत्याने मागणी करीत होते. ही बाब रमेश थोरात आणि जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री यांचेकडे व्यक्त केली. सदर दौंडच्या विकासासाठी निधीचा आग्रह धरून पाठपुरावा करून हा 5 कोटी निधी मिळवून दिला.
या निधीतून दौंड शहरात चैतन्य हनुमानं मंदिर विकसित करणे, संरक्षक भिंत बांधणे, आणि आखाडा विकसित करणे 75 लाख रुपये, हिंदू बेस्तर समाज बहुउद्देशीय इमारत बांधणे 25 लाख रुपये,  प्रभाग क्रमांक 5  प्रबोदन कार शंकरराव सोनवणे सभागृह दुसरा मजला बांधणे 25 लाख रुपये, प्रभाग 7 व 8 दत्त मंदिर सभागृह बांधणे 25 लाख रुपये, सईद बाबा दर्गा सभामंडप बांधणे , प्रभाग 11 शिव छत्रपती उद्यान विकसित व सुशोभित करणे 50 लाख रुपये, प्रभाग 12 भोईटे नगर येथे पथदिवे बसवणं , खुली व्यायामशाळा व फुले पुतळा सुशोभीकरण 25 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 3 इंदिरानगर वाचनालय बांधणे ,भीमानदी नवीन घाट विकसित करणे, विठलं मंदिर सुशोभित करणे 25 लाख रुपये, अशी  कामे करण्यात येणार आहेत. तांत्रिक बाब पूर्ण करून सदर विकास कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असेही शेख यांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या