Breaking News

सोयाबीनच शेतकऱ्यांना तारणार, तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण

 


पुणे : खरीप हंगामातील पिके सध्या अंतिम टप्प्यात आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सोयाबीनच आता शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. दिवाळीपुर्वी सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 रुपयांवर होते आता मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी होत असल्याने सोयाबीनच्या किमंती वाढत आहेत. सध्या सोयाबीनला 6 हजार प्रतिक्विंटलचा दर आहे. तर दुसरीकडे बाजारात नव्या तुरीची देखील आवक सुरु झाली. सुरवातीच्या टप्प्यात आवक वाढल्याने तुरीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार झालेला आहे. दिवाळीपुर्वी सोयाबीनला 4 हजार 500 रुपये भाव होता. मात्र, त्यानंतर बाजारपेठेतले चित्र हे बदलले आहे. सोयाबीन हे 7 हजार रुपये क्विंटलपर्यंत जाईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


No comments