दीनमित्रकार पत्रकारीता व साहित्य पुरस्काराचे वितरण :


कुकाणा :


- दीनमित्रकार मुकुंदराव पाटील हे फक्त लिहीत नव्हते तर ते कृतीतुन करून दाखवत होते. समाजातील पांढरपेशी लोकांच्या विरोधात त्यांनी परखड लेखन केले त्यामुळे त्यांना त्रासही झाला. ग्रामीण भागातील रंजले - गांजलेल्यांना पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. अंधश्रद्धा व रुढी पंरपरा मुळे ग्रामीण भागाचे नुकसानही झाले. मुकुंदराव पाटीलांचे विचारच समाजाला तारक ठरणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
  नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या १३६ वी जयंती निमीत्ताने स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारे सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षीचे 
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारीता व साहित्य पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले होते. ज्ञानेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख, सुधीर लंके , समितीचे सचिव उत्तमराव पाटील, संचालक प्रा. नारायण म्हस्के, काशिनाथ नवले, प्रा. अशोक ढगे, बाळासाहेब पाटील आदी व्यासपीठावर होते. पाहुण्याचे स्वागत दीनमित्रकार मुकुंदराव पाटील समितीचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष बाबा आरगडे यांनी केले. 

शाहिर भारत गाडेकर यांनी वंदन माणसाला हे स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
यावेळी दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार सचिन शंकर परब (मुंबई), श्रीमंत माने (नाशिक) ,साहित्य पुरस्कार (सन २०१९ - २०) , (भक्ती,भिती,भास-वैचारिक), प्रकाश त्रिभुवन, औरंगाबाद (कुळंबीण-कादंबरी), डॉ. शिवाजी काळे, अहमदनगर (गावकुसातल्या गोष्टी-कथा), संदिप जगदाळे, पैठण
साहित्य पुरस्कार (सन २०२०-२१)
डॉ.गजानन भिंगारदिवे,सांगली , रमेश चव्हाण,पुणे , डॉ. राजेंद्र मगर, सोलापूर , अरुणा दिवेगावकर, लातूर , डॉ.राजेंद्र गायकवाड,परभणी, भरत काळे ठाणे, संतोष जगताप,सोलापूर, प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, लातूर,  कैलास दौंड, अहमदनगर,  माधुरी मरकड,अहमदनगर, डॉ. सुभाष वाघमारे, सातारा या पुरस्कार्थांना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार नरेंद्र घुले यांचे हस्ते सन्मान चिन्ह , सन्मान पत्र, शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. 

 यावेळी पुरस्कारार्थी डॉ. राजेंद्र गायकवाड, ज्येष्ठ लेखक रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डॉ. प्रा. बाबुराव उपाध्ये , ज्येष्ठ लेखक जे.ए. उगले, प्रा.डॉ. शिरीष लांडगे, शिवसेनेचे हरिभाऊ शेळके, आमोल अभंग,मनोहर बोराटे ,उपसरपंच सोमनाथ कचरे ,प्रा.शकुर शेख ,समीर पठाण,कैलास म्हस्के,मनोज हुलजुते सह ग्रामस्थ उपस्थित होते.ज्येष्ठ साहित्यीक प्रा. भाऊसाहेब सावंत व प्रा. सुनिल इंगळे यांनी सुत्रसंचालन केले तर समितीचे विश्वस्त यशवंत पाटील यांनी आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या