Breaking News

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा : कृषी अधिकारी ढवळे


मांडवगण फराटा:


शेतकरी ग्राहकांनी कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.आर ढवळे यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका वअन्न नागरी पुरवठा विभाग तहसील कार्यालय शिरूर  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन प्रबोधन सप्ताहाच्या मौजे वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते याप्रसंगी शेतकरी ग्राहकांनी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ढवळे यांनी  केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासाई देवी सोसायटीचे अध्यक्ष सुरेशचंद्र ढवळे हे होते.
शेतकरी मेळाव्यामध्ये तालुका कृषी अधिकारी ढवळे यांनी मार्गदर्शन करताना महा डीबीटी पोर्टल योजना, कृषी यांत्रिकीकरण, महिलांना अपंगांना प्राधान्य असले बाबत सांगितले, गांडूळ खत प्रकल्प अनुदान, कांदा चाळ, फळबाग योजना, शेततळे अनुदान, अल्पभूधारक यांना 55 टक्के अनुदान पॉलिहाऊस, सबसिडी ,याबाबत जॉब कार्ड असणे आवश्यक आहे, इत्यादी विविध योजनांची सखोल माहिती दिली. 

अध्यक्षीय भाषणामध्ये सुरेश आण्णा ढवळे यांनी ग्राहक पंचायत ची कार्यपद्धती, तसेच कृषी विभागाच्या येणाऱ्या अडचणी बाबत, तालुका कृषी अधिकारी यांना सांगितले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडल कृषी अधिकारी रेणुका गायकवाड, कृषी सहाय्यक  शितल गुलदगड, कृषी पर्यवेक्षक कांतीलाल विर, विशाल चव्हाण ,वनाधिकारी शिरूर, गोविंद शेलार सर्पमित्र, तुकाराम बुवा फराटे जिल्हा कार्यकारणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संपत नाना फराटे संघटक, पंडित मासळकर , महिला संघटक सुवर्णा पवार सहसंघटक, नामदेव चव्हाण कोषाध्यक्ष,अविनाश ढवळे,भिमराव जराड महाराज, भगीरथ परभाने ऊर्जा समिती प्रमुख, आदी ग्राहक पंचायत पदाधिकारी व वडगाव रासाई ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शिर्के, तालुका सचिव, यांनी केले.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र जगताप अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका यांनी केले, तर कार्यक्रमाचा समारोप वडगावचे  सरपंच सचिन शेलार यांनी केला. तुकाराम फराटे यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.

No comments