Breaking News

आज दत्तजयंती सोहळा...

 
भाविकांच्या स्वागतासाठी देवगडनगरी सज्ज

नेवासा : नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे आज शनिवारी दि. १८ डिसेंबर रोजी भगवान दत्तात्रयांचा दत्तजन्म सोहळा सायंकाळी ६ वाजता गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य हभप भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली व संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. 
   सामाजिक अंतराचे पालन करत सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून श्री दत्त मंदिर संस्थान च्या वतीने तयारी करण्यात आली असून भाविकांच्या स्वागतासाठी देवगडनगरी सज्ज झाली आहे.मंदिर परिसरात वाहन पार्किंग,आरोग्यसेवा,दुकानदारांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.मंदिर प्रवेशद्वारासह भगवान दत्तात्रय मंदिरावर संत किसनगिरी बाबा समाधी मंदिर,पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर येथे श्रीरामपूर येथील सत्कार डेकोरेटर्स यांच्या वतीने केलेली विद्युत रोषणाई भाविकांना आकर्षित करत आहे.
       दत्तजयंती निमित्ताने मंदिर प्रांगणातील कीर्तन मंडपामध्ये श्री दत्त जन्म सोहळा आज संध्याकाळी ६ वाजता शंख निनाद सनई चौघडा वादन करत वेदमंत्राच्या जयघोषात संत महंतांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून श्री दत्त मंदिर भक्त स्वयंसेवक भाविकांच्या  सेवेसाठी सज्ज झाले आहे.

No comments