वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार : गणेश इंगळे


बारामती :


 बारामती तालुक्यातील सर्व अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून पारदर्शक व स्वच्छ काम करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले. दरम्यान पिस्तुलाचे स्टेटस ठेवणे, तलवारीने केक कापणे अशांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

    माळेगावची आगामी निवडणुक व माळेगावातील दुषीत राजकारण व उद्भवणाऱ्या समस्या याबाबत माळेगाव पोलीस दुरक्षेत्रात उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सर्व पत्रकार व पोलीस पाटील यांच्याशी विविध विषयांवर सखोल चर्चा केली.
     यावेळी अवैध धंदे कायम बंद करणे,माळेगाव पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस कर्मचारी वाढविणे, महिला पोलिस कर्मचारी नेमणूक करणे, रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक शाळेत निर्भया पथकाच्या वतीने प्रबोधन करणे व बिट आंमलदार भेटी देणे, माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून हप्ता वसुली करणा-यांवर कारवाई करणे, सांगवी ता.बारामती येथील अतिक्रमणे काढणे, माळेगांव कारखाना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे, बारामती-फलटण रोडचे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे, अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाई करणे, फ्लेक्स बंदी करणे, अवैध वाहतुकीला चाप बसविणे, राजकीय आकसातुन खोटे गुन्हे दाखल होण्याची सत्यता पडताळून पाहणे, समाजात सलोखा निर्माण करणे, सोशल मीडियातील आक्षेपार्ह संदेशावर नजर ठेवणे, राजहंस चौकात वहातुक कोंडी बाबतीत उपाय योजना,  पोलिसांची प्रतिमा उंचावणे इ.विषयांवर चर्चा झाली.
    यावेळी जेष्ठ पत्रकार कल्याण पांचागणे, विजय भोसले, प्रा.अनिल धुमाळ, संदिप आढाव, प्रा.अनिल तांबे, संजय कांबळे, अनिल तावरे,प्रणव तावरे यांनी विविध विषयांवर मते मांडली.यावेळी क्यामुद्दिन शेख, अक्षय थोरात, भारत तुपे, प्रमोद जाधव, पोलीस पाटील सतिश शेंडगे (येळेगाव), सुरेश काटे (पाहुणेवाडी), मुनेश राऊत (खांडज), नितीन घनवट(शिरवली), राजेंद्र तावरे (सांगवी) खांडजचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आबासो जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे तर आभार योगेश भोसले यांनी मानले.
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या