Breaking News

उपनगराध्यक्ष घुंडरेंचे सामाजिक कार्य मोलाचे
आळंदी : 

कोरोणा महामारीने माणूस आणि माणुसकी दोन्ही हरवत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोणामुळे असंख्य लोकांना मोठी झळ बसली आहे, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. मात्र अशा गंभीर परिस्थितीत अनेकांनी माणुसकीचा हात पुढे करून गरजू लोकांना मदत केली आहे. आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांनीही जीवनावश्यक वस्तूंचे रूपाने असंख्य लोकांना आधार दिला आहे, त्यांचे हे कार्य मोलाचे आहे असे गौरवोद्गार महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी काढले आहे.आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा यावेळी महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे,माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर,पंडित महाराज क्षीरसागर,दासोपंत महाराज स्वामी,नगरसेवक प्रशांत कु-हाडे,सचिन गिलबिल,माजीे नगरसेवक विलास घुंडरे,आनंद मुंगसे,दिनेश घुले,माजी संचालक हनुमंत घुंडरे,नितीन घुंडरे,निसार सय्यद,राहुल घुंडरे,मंगल हुंडारे आणि कामगार नेते अरुण घुंडरे उपस्थित होते.

No comments