Breaking News

अवकाळी पावसाने मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान


पारगाव शिंगवे : प्रतिनिधी 

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील अवकाळी  पावसाने ज्वारी ,कांदा  व मेंढपाळ यांचे  अतोनात नुकसान झाले आहे.रात्रभर  संततधार पाऊस  सुरु  असताना अचानक थंडीची हुडहुडी वाढली आहे. या थंडीचा सर्वाधिक फटका मेंढपाळांना बसलेला आहे. शिंगवे भागातील वास्तव्याला असलेल्या  मेंढपाळाच्या जवळपास 25 ते 30 पेक्षा जास्त शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यु झाला आहे.

यात मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाची संततधार आणि थंडीची हुडहुडी यामुळे शेळया मेंढ्यांचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडुन व्यक्त करण्यात आला असुन जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कड  आणि महसूल विभागाचे मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, कोतवाल यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करून भरपाई बाबत मेंढपाळांना आश्वासन देण्यात आले.


No comments