सुनेत्रा पवार 'मोरया गोसावी' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित


सोमेश्वरनगर  : 

चिंचवड देवस्थान ट्रस्ट व पिंपरी चिंचवड महानगरपालीकाच्या सयुंक्त विद्यमाने सुरु असलेल्या  श्रीमन् महासाधू  मोरया गोसावी संजीवनी समाधी  सोहळ्याची आज दि .२५ रोजी  सांगता झाली . या पूर्वसंध्येस काल दि. २४ रोजी सामाजिक , शैक्षणिक , पर्यावरण  क्षेत्रात अतुल्य कामगिरी केल्याबद्दल बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा  सुनेत्रा अजित पवार यांना 'श्रीमन्  महासाधू मोरया गोसावी  जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित केले .

काल सायंकाळी झालेल्या या  कार्यक्रम प्रसंगी  मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा )  बारणे,  प्रमुख पाहुणे  डॉ. अजिंक्य, डी . वाय,  पाटील  युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष डॉ.एकनाथ खेडकर, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव,  विनोद पवार, विश्राम देव, हभप आनंदमहाराज तांबे, राजेंद्र उमाप, महापौर अपर्णाताई डोके, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे,  विठ्ठल भोईर, गजानन चिंचवडे, शहाजी उमाप, माजी महापौर मंगलाताई  कदम  व विविध क्षेत्रातील प्रमुख उपस्थित होते.


सामाजिक , शैक्षणिक क्षेत्र , महीला सबलीकरण  ,   मोतीबिंदू झालेल्या हजारो  रुग्णांना  दृष्टी देण्याचे काम , पाच लाख  वृक्ष लागवड   आदी विविध क्षेत्रात  अतुलनीय कामगीरी केल्याबद्दल बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा  सुनेत्रा अजित  पवार यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्काराने संजीवनी समाधी दिनाच्या पुर्वसंध्येस  देवस्थानचे विश्वस्त मंडळ व  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित  केले . या पुरस्काराला  उत्तर देताना  सुनेत्रा पवार म्हणाल्या  की हा सन्मान माझा एकटीचा नसून  समस्त  स्त्रींयांचा  सन्मान आहे .या पुरस्काराने माझी आणखी जबाबदारी वाढली  असुन समाजकार्याचे पत्कारलेले काम मी नक्कीच उत्तरोतर वृध्दिंगत करेल असे  सांगितले .

याचबरोबर ट्रस्टच्यावतीने सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या बोरमलनाथ गोशाळाचे संस्थापक   कैलास एकनाथ शेलार, प्राजक्ता मतीमंद स्कुलचे  संस्थापक जयराम सुपेकर, दत्तात्रय उर्फ आबा काळे, रुक्मिणी तारु यांसह १३ लोकांना  मोरया पुरस्काने सन्मानित केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र उमाप,  स्वागत विनोद पवार तर शेवटी आभार आनंद तांबे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या