राज्य माध्यमिक शिक्षकेतर महामंडळाचे ४९ वे अधिवेशन


लिंपणगाव :


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाची राज्य कार्यकारीणी सभा व्ही. एन. पाटील लॉ कॉलेज औरंगाबाद येथे रविवार
रोजी सकाळी ११ वाजता शिक्षकेत्तर महामंडळाचे अध्यक्ष मा. वाल्मीक सुरासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आले.  या बैठकीमध्ये महामंडळ मार्गदर्शक विनायक कुलकर्णी पुणे, मोहन मोरे सोलापूर, एस. डी. डोंगरे ठाणे, शामराव बागल पंढरपूर यांचा सन्मान करण्यात आला. 

तसेच ठाणे जिल्ह्यातील नुतन पदाधिकारी भरत जाधव अध्यक्ष अतुल पाटील कार्यवाह, कृणाल दोंदे सेवक प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात येऊन जिल्हा संघटनेस मान्यता देण्यात आली. या बैठकीसाठी महामंडळ राज्य पदाधिकारी केशव पाटील (कार्याध्यक्ष) प्रियंका मुणगेकर, कृणाल दोंदे, राजमहमद पठाण, दिपक कडू, विभागीय कार्यवाह अजय शितोळे (पुणे विभाग), सोमनाथ धात्रक (नाशिक विभाग), राजेश धांडे (अमरावती विभाग), लिलाराम जसुजा (नागपूर विभाग), अवदुत कोटेवार, प्रमोद पाटील, एस. बी. जगताप, राजकुमार चेनानी, रामनाथ थेटे मामा, शांताराम देवरे, प्रकाश मारणे, धनवटे बी. आर. गायकवाड आर. एफ. ढाकणे एन. यु., वेताळ पी. डी., पठाण एन.एल. डी. के. लांडगे, रविंद्र जाधव, राजेंद्र बाविस्कर, आसाराम शेळके, भारत चाटे, अरुण शिंदे, विजय निकम, गजानन राठोड, काकडे डी एस, जाधव आर पी, पाराजी मोरे, समशेर पठाण, परशुराम वेताळ ,नंदकुमार कुरुमकर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या