Breaking News

शहीद बिपिन रावत यांना श्रध्दांजली


बोधेगाव :

           हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहिद झालेले भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत सह त्यांचे सहकारी यांना बोधेगाव येथील बन्नोमॉ दर्ग्यात समस्त ग्रामस्थांच्या वतीने मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 
         बोधेगावातील निवृत्त फौजी अधिकारी मेजर परशुराम पाचपुते, बाबासाहेब अंधारे, भारतीय आर्मीत सेवा देत असलेले रविंद्र घोडके, राहुल लाड, सुरेंद्रकुमार बानाईत, अजिनाथ मोराळे सह माजी सरपंच रामजी आंधारे, विष्णु वारकड, कुंडलिकराव घोरतळे, केदारेश्वरचे प्र.कार्यकारी संचालक रमेश गर्जे, माजी जि प सदस्य प्रकाश भोसले, उपसरपंच भाऊराव भोंगळे, बडे मामा, अस्मनराव घोरतळे, विठ्ठल तांबे, विश्वनाथ घोरतळे, विश्वनाथ कुढेकर, संजय बनसोडे, प्रकाश काळे, सिताराम भागड, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बन्नु भाई शेख, परमेश्वर तांबे, दत्तात्रय शिंदे, सुवृद्धेश पडोळे, सामाजिक कार्यकर्ते बाबा पठाण, शाहु खंडागळे श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितानी मेणबत्त्या लावुन बिपिन रावत सह त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रध्दांजली वाहण्यात आली. सेवानृवत्त मेजर बाबासाहेब आंधारे यांनी यावेळी बिपिन रावत यांच्या सोबत काम केल्याचे अनुभव लोकासमवेत शेअर केले. कार्यक्रमाचे नियोजन रामजी आंधारे सह माजी निवृत्त अधिकारी परशुराम पाचपुते यांनी केले.  

No comments