आगामी काळात वेल्ह्याचा विकास : उपमुख्यमंत्री पवार

लवकरच वेल्हे तालुक्याचे राजगड तालुका म्हणून नामकरण



नसरापूर (प्रतिनिधी)

छत्रपती शिवरायांची कर्मभूमी असलेल्या वेल्हे तालुक्याचा विकास आगामी काळात होईल, तसेच वेल्हे तालुक्याचे  नामकरण राजगड तालुका करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन व विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

तोरणागडाच्या वीजपुरवठ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यांनी नियोजित वेल्हे पोलिस इमारतीच्या जागेची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे जिल्हा दूध संघाचे भगवान पासलकर, काँग्रेसच्या वेल्हे पंचायत समितीचे माजी सभापती संगीता जेधे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेल्हे तालुक्यातील सहाशेहून अधिक जणांनी प्रवेश केला. वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष रेणुसे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष किरण राऊत यांनी केले तर  निवेदक विठ्ठल पवार यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.
 ,
यावेळेस आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे,  पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे,विकास दांगट पाटील, महिला जिल्हाध्यक्ष भारतीय शेवाळे, पुणे जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष विश्‍वास देवकाते ,रेवणनाथ दारवटकर, भालचंद्र जगताप, दूध संघाचे उपाध्यक्ष वैशाली गोपालघरे,चंद्रकांत बाठे,रामदास भांडे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, भोरचे सभापती लहू नाना शेलार,संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब पासलकर, शिवाजी कोंडे,बारामती समन्वयक प्रवीण शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत, प्रदीप मरळ,तानाजी मांगडे,प्रियांका मांगडे, चेतन मांगडे,आनंद देशमाने ,युवक तालुकाध्यक्ष  प्रमोद लोहकरे,नंदू रसाळ, संदीप खुटवड ,पांडुरंग निगडे,गणेश निगडे ,स्वप्नील कोंडे,संग्राम कोंडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या