निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याऐवजी भाजपला मतदान करू नका !- भुजबळ



मुंबई : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून जोरदार वाद सुरू आहे. इंपेरिकल डेटावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. इंपेरिकल डेटा गोळा करणे ही राज्याची जबाबदारी आहे, असे भाजप सांगत आहे. तर केंद्र सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा दिला नाही, म्हणून ओबीसी आरक्षण स्थगित झाले असे महाविकास आघाडी आरोप करत आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी आता भाजपवर काही सवाल उपस्थित केले आहेत.इंपेरिकल डेटावरून आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असताना, अनेक ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिसू लागले आहेत, त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार न टाकता भाजपला मतदान करू नका असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे, त्यामुळे आता भाजपकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. किमान आगामी येणाऱ्या निवडणुका तरी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या