भाजपाने महावितरण अधिकारी धरले धारेवर


श्रीरामपूर :

तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडीचा सपाटा तसेच वीज रोहित्र (ट्रांसफार्मर) जळाल्यास शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली करत वेठीस धरणाऱ्या महावितरण कार्यालयावर भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर च्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेतकरी बांधव भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी हा कोरोना सारख्या आजाराने ग्रस्त असताना त्यात अतिदृष्टी सावट शेतकऱ्यांवर असताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन व वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) याची गरज शेतकऱ्यांना गहू ,कांदा, नवीन ऊस लागवड आदी साठी लागत आहे तरीसुद्धा वीज महावितरण शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता शेतकऱ्यांवर अन्याय करत यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले तुम्ही तहसील कार्यालय, नगरपालिका, इतर शासकीय कार्यालय ,अधिकारी यांचे वीज कनेक्शन बिल न भरल्यास कट करता का तहसीलदार कार्यालयाचे दोन लाख रुपये थकबाकी नगरपालिकेची विज बिल 40 लाख रुपये थकबाकी असताना तुम्ही त्यांना कधी नोटीस पाठवली का आणि शेतकऱ्यांना नोटीस न देता थकबाकी असल्यास वीज कनेक्शन लगेच कट केले जाते हा दुजाभाव का केला जातो हे बंद झाले पाहिजेत असे त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून 

महावितरणच्या या अन्यायाविरुद्ध भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनील वाणी, जालिंदर वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, गणेश राठी, सचिव अनिल भनगडे ,विठ्ठल राऊत, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सुप्रियाताई धुमाळ यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर येथे धडक मोर्चा महावितरणवर निघाला

 यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बबनराव मुठे ,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रा. मोहनराव वमने ,शहराध्यक्ष मारुती बिंगले,तालुका सरचिटणीस प्रफुल डावरे ,संतोष हरगुडे, मुकुंद हापसे ,महिला तालुकाध्यक्ष सौ.रेखा रिंगे,सौ.अनिता शर्मा, सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष बंडू कुमार शिंदे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दत्ता जाधव,उपाध्यक्ष पुरुषोत्तम भराटे ,भाऊसाहेब पवार ,सागर ढवळे, राकेश कुंभकर्ण ,रवींद्र मुंडे, नवनाथ फोफसे,योगेश राऊत, नाना राऊत,अरुण काळे, नानासाहेब लांडे,नवनाथ काळे, सचिन बनकर,बापुसाहेब वडीतके,सचिन धनवटे, जितेंद्र पठारे, एकनाथ पठारे, देविदास चव्हाण, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष गनी सय्यद,अमोल तांबे,गोंडेगावचे माजी सरपंच गीताराम पोखरे,शहर सरचिटणीस अजित बाबेल,रवी पंडित ,उपाध्यक्ष चंद्रकांत परदेशी,मिलिंद साळवे,कांतीलाल बोकडीया, विजय आखाडे ,विशाल अंभोरे, विजू लांडे, गणेश बिंगले, मच्छिंद्र हिंगमिरे, योगेश ओझा, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, उपाध्यक्ष रुपेश हरकल ,सचिव अक्षय नागरे ,युवा मोर्चा शहर अध्यक्ष अक्षय वर्पे, गौतम जावरे, स्वप्नील जावसे, किरण कर्नावट, हंसराज बत्रा,अतुल झिरंगे, गणेश कोरडे ,किरण रकटे, संजीव उंडे,राज खान, हुसेन खाटिक, परवेज शेख, सुधीर पगार ,प्रतीक वाघमारे निखिल यादव, हर्षल शेळके, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या