रेशनचा माल खुल्या बाजारात विकणाऱ्या दोघांवर कारवाई

 दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत


बारामती :
स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी ठेवलेला तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेहणाऱ्या चालक वैभव भारत दनाने (रा: तांदुळवाडी रोड बारामती) तसेच किराणा दुकानदार वसंत सोमनाथ पोटी (रा: खाटीक गल्ली) या दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणी टेम्पो व १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. 
 छोटा हत्ती गाडी नंबर (एम एच ४२ AQ ५८०५) यामधून स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी ठेवलेला तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी जात अशी गुप्त माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्तीवर असताना माहिती मिळाली. दरम्यान सदर वाहनाचा तपास पोलिसांनी घेतला असता त्या वाहनांमध्ये एकूण ३० पोती तांदळाची पन्नास किलो ची मिळून आली. पोलीसांनी  सदर बाबत चालक वैभव भारत दनाने  याच्याकडे बिलाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही बिल मिळाले नाही. त्याने त सदरचा माल किराणा दुकानदार वसंत सोमनाथ पोटी याचा असल्याचे सांगितले. पोलीसांनी मालकास खरेदीच्या पावत्या विचारले असता त्याकडे सुधा पावत्या नसल्याचे समोर आले.

त्यामुळे पोलिसांना खात्री झाली की सदरचा माल शासकीय  बरदना बदलून खाजगी बारदाना मध्ये भरलेला आहे. व खुल्या बाजारात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे दाखवून विक्रीसाठी चाललेला होता. सदर मालाच्या खरेदीबाबत तेही कोणतेही पुरावा देऊ शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी सदरचा टेम्पो व १ लाख ६८  हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपी यांनी स्वस्त धान्य याबाबत असलेल्या शासनाच्या व माननीय जिल्हाधिकारी यांच्या कंट्रोल ऑर्डर चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे सदर दोन्ही आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस नाईक खांडेकर, पोलीस नाईक तुषार चव्हाण व पवार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या