ओबीसी समाज मुस्लिम धर्म स्वीकारणार का?; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल



मुंबई: ओबीसींच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात टोलवाटोलवीचं राजकारण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. ओबीसींना आपली आर्थिक उन्नती साधायची असेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत ते मुस्लिम धर्म स्विकारत नाही तोपर्यंत धर्माल कोणताही धोका नाही. त्यामुळे माझा प्रश्न आहे की ओबसी मुस्लिम धर्म स्वीकारणार का?, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकरांच्या या विधानामुळे राज्यात नवं राजकीय वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही 9 मराठीशी खास संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जोपर्यंत ओबीसी मुस्लिम धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत त्यांची आर्थिक उन्नती होणार नाही. ओबीसींनी आपल्या आर्थिक उन्नतीकडे आणि सामाजिक प्रतिष्ठेकडे लक्ष दिलं पाहिजे. ते द्यायचं असेल तर त्यांना या धर्मांध पक्षाच्या बाहेर पडावे लागेल. ज्या पक्षांना ते आपलं मानत आहेत, त्या पक्षांना सोडून स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करावा लागेल, असं सांगतानाच ओबीसी हे मुस्लिम धर्म स्वीकारणार नाहीत हे शंभर टक्के सर्वांना माहीत आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं. माझा प्रश्न की ओबीसी समाज हा मुस्लिम धर्म स्विकारणार का? मुस्लिम हा १५ टक्के आहेत. सर्व पदे हे हिंदू समाजाने व्यापलेली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या