खेड तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसाने नुकसान


वाफगाव 
प्रतिनिधी 

खेड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेले या पावसाचा पिके तसेच  सर्वसामान्य नागरिक यांना फटका बसला आहे. सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू होती.हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.तालुक्यात गेल्या दोन दिवस  ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतातील रबी पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. दि 1 रोजी सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसाळा कांदा पिक तसेच ज्वारी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे तसेच या पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा बटाटा पालेभाज्या तसेच अन्य पिकांना फटका बसला आहे.

 वाकळवाडी ता खेड येथील प्रगतशील शेतकरी  संदीप कचरू सांडभोर त्यांचे उभे असलेले बाजरी पीक पूर्णतः जमीनदोस्त झाले आहे साधारणत दोन एकरावर बाजरी पीक होते आधीच शेतकरी पावसाळ्यात पाऊस नसल्याने संपूर्ण पीक आले नाही त्याचप्रमाणे तो हंगाम वाया गेला आणि आता यावेळेस हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाले आहेत

शेतकरी अगदी हताश झाले आहेत. सोसायटीचे कर्ज काढून अगदी  तसेच बँकांचे कर्ज काढून शेतकरी शेतावरती आपली उपजीविका करत असतो. त्या उपजीविकेवर या अवकाळी पावसाने अक्षरशः नांगर फिरवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या