दरोड्यातील सहा संशयीत ताब्यात अवघ्या दोन दिवसात तपासात यश


आळेफाटा  :  प्रतिनिधी 

येथे पिस्तुलाचा धाक दाखवून एका व्यवसायिकाकडून रोख रक्कम व मोबाईल घेऊन पोबारा करणाऱ्या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली. अशी माहिती पुणे ग्रामिणचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश खट्टे यांनी आयोजित केलेल्या आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत माहिती देताना अप्पर पोलिस अधिक्षक अमित खट्टे यांनी सांगितले की नगर कल्याण महामार्गावर असलेल्या आळे गावच्या हद्दीत असलेल्या साई इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात सोमवारी  ( दि ७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सहाजणांच्या टोळक्याने दुकानात जाऊन अविनाश पटाडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण एकवीस हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. सदर गुन्हा आळेफाटा सारख्या मुख्य बाजारपेठत घडल्यामुळे स्थानिक नागरिक व व्यापारी वर्ग यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक अमित खट्टे विभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत योग्य त्या सुचना देण्यात आल्या.  त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिस स्टेशन यांची संयुक्त पथके तपासकामी पाठविण्यात आली या तपासपथकाने तपास करुन ऋषीकेश बळवंत पंडित ( वय २२ वर्ष रा खरवंडी खळवाडी ता नेवासा जि अहमदनगर अरबाज नबाब शेख ( वय २० वर्ष रा वडाळा व्हरोबा ता नेवासा जि. अहमदनगर वैभव रविंद्र गोरे  वय २२ रा खरवंडी ता नेवासा जि अहमदनगर) राहूल रामू चव्हाण (वय २० वर्ष रा खरवंडी ता नेवासा जि अहमदनगर) राहूल राम चव्हाण (वय २० वर्ष रा खरवंडी ता नेवासा जि अहमदनगर) प्रकाश विजय वाघमारे (वय २० रा माळी चिंचोरा ता नेवासा जि अहमदनगर) व शुभम बाळासाहेब शिंदे (वय २१ वर्ष रा खरवंडी खळवाडी  ता नेवासा जि अहमदनगर) यांना तपासकामी ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

 सदरची कारवाई ग्रामिणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक अमित खट्टे, विभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षण अशोक शेळके, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, स्थानिक गुन्हे शाळेचे आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलिस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, पोलिस नाईक, संदीप वारे, पोलिस काॅनस्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर, प्रसन्ना घाडगे, पोलिस हवालदार प्रमोद नवले, पोलिस मित्र प्रसाद पिंगळे यांच्यासह आळेफाटा ओतुर जुन्नर पोलिस कर्मचारी यांनी केला.

 सदर पत्रकार परिषदेस जुन्नर तालुक्याचे यूवानेते अमित बेनके आळे गावचे उपसरपंच विजय कु-हाडे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले उपस्थीत होते. या दरोड्याचा तपास अवघ्या दोन दिवसात केल्यामुळे सर्व उपस्थित मान्यवरांनी  सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या