Breaking News

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना पकडले

निरगुडसर :


वॉरंट रद्द करून देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजारांची लाच मागून दोन हजार घेणाऱ्या घोडेगाव ता.आंबेगाव येथील पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. घडलेल्या घटनेने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. कोंडाजी दामोदर रेंगडे (वय ५३) ए.एस.आय, घोडेगाव पोलीस ठाणे असे त्याचे नाव आहे.

यातील तक्रारदाराविरूद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून घोडेगाव न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी तक्रारदार न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने वॉरंट काढले होते. ते वॉरंट रद्द करून देण्यासाठी ए.एस.आय.रेंगडे यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रूपये घेताना त्यांना ए सी बीने रंगेहात पकडले आहे.

लाचलुचपत विभागाने आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. आरोपीविरुद्ध घोडेगांव पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

No comments