राज्यात नवे नियम, ओमिक्रॉनचा धोका वाढला



मुंबई: राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं.

राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तासतरी सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहितील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या