Breaking News

कोल्हे कारखान्यावर गुरुचरित्र पारायण सोहळा


कोपरगांव तालुका प्रतिनिधी -  


सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर १४ वर्षापासुन  गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन होत असून त्याची सांगता बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.  ७५ पारायणार्थीचा श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तज्ञ संचालक विवेक कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, संजीवनी उद्योग समुहाच्या विविध संस्थांचे आजी माजी संचालक, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, स्वामी समर्थ केंद्र कोपरगावसह विविध केंद्राचे मार्गदर्शक, महिला भगिनी, कामगार आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिपीनदादा कोल्हे  पुढे म्हणाले की, आई आणि गुरु या दोन व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत मौलवान असतात, एक आपल्याला घडवते तर गुरु जीवनातील अडचणींचा अंधकार प्रकाशमान करण्यांचे काम करतात. गुरूंची महती गुरुचरित्र दत्त सेवेत सर्वांना समजते. तेव्हा प्रत्येकाने कितीही अडचणी आल्या तरी गुरुसेवा खंडीत करू नये असेही ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. चंद्रकांत जाधव यांनी सूत्रसंचलन केले.

No comments