पुतळा विटंबना प्रकरणी निषेध


बारामती :


   कर्नाटक राज्यातील बंगलोर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विंटबना प्रकरणी शिवसेना, ग्रामस्थ, व्यापारी व मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. यावेळी जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान कोणत्याही बंद न पाळता आयोजित करण्यात आलेल्या निषेध कार्यक्रमाचे व्यावसायिकांनी कौतुक केले आहे.
   
    अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे झाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटु लागले आहेत. माळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका शिवसेना प्रमुख विश्वास मांढरे यांनी केले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मबई यांनी शिवप्रेमीची माफी मागावी, तसेच कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी विश्वास मांढरे, रहेमान शेख,कुरबान बागवान, युसुफ पठाण, रविराज तावरे , योगेश भोसले यांनी निषेध व्यक्त केला. या प्रसंगी माजी उपसरपंच अजित तांबोळी,सचीन कुचेकर, जगन्नाथ सोलनकर,शरिफ बागवान,रोहन सोनवणे, शांताराम नलावडे, दत्ता गाढवे, रोहित शेळके, बंटी चव्हाण आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या