Breaking News

नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय



  सध्या 4 लाखहून अधिक शेतकरी हे नैसर्गिक शेतीचा प्रयोग करीत आहेत. पण ही संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकार योग्य ते निर्णय घेत आहे. पायाभूत गोष्टी शेतकऱ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. त्यामुळे देशभर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगतिले आहे. गुजरात येथील आनंदमधील नैसर्गिक शेती जनजागृती संदर्भातील कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. एवढेच नाही तर देशातील 2 राज्यांमध्ये हे काम सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

केवळ उत्पादन वाढीसाठी देशात शेती व्यवसयात रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. मात्र, उत्पादनाच्या बाबतीत भारत देश हा आत्मनिर्भर झालेला आहे. त्यामुळे आता अधिकच्या उत्पादनाबरोबरच शेत जमिनीच्या आणि मानवाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जे उत्पादन वाढेल त्याचाच फायदा नागिराकांच्या आरोग्याला होणार आहे. रासायनिक शेतीमुळे शेत जमिनीचा दर्जा तर खलावत आहेच पण त्याचा विपरीत परिणाम हा शरीरावरही होत आहे. नैसर्गिक शेतीमध्ये अधिकचा पैसाही खर्च होत नाही. आता 4 लाख शेतकरी हे सेंद्रिय शेती करीत आहे. मात्र, भविष्यात हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.

No comments