अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागाही उध्वस्त



सोलापूर : सबंध राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या असल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली तर पंढरपूर तालुक्यातही अवकाळीने अवकृपा दाखविल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले असल्याने द्राक्षाचे घड हे कुजत आहेत.

वर्षभरापासून जोपासलेल्या द्राक्ष फळबागांचे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नुकसान होत आहे तर नुकताच पेरा झालेल्या रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायच अडचणीत आला आहे. उत्पन्न वाढीच्या अनुशंगाने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात पण निसर्गाची अवकृपा सातत्याने होत असल्याने पदरी निराशाच पडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या