देव दानव युध्दाने डोळ्यांचे पारणे फिटले


पाटस :  


दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील भानोबा देव व दानव यांच्या युध्दांचा पारंपारीक खेळ पाहण्यासाठी आलेल्या लाखो भक्तांनी देव दानव यांच्या युध्दाचा थराराक खेळ पाहिला मिळाला. यंदा प्रथमच भानोबा देव व दानव यांच्या युध्दावर हेलीकॅप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत नागरीकांनी मोठी गर्दी केलीहहोती. विशेषात महिलांची गर्दी लक्षणीय होती. भानोबा देवाची ही यात्रा पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. 
    पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देव-दानव युध्दाचा पारंपारीक खेळ म्हणून प्रसिध्द असलेली  दौंड तालुक्यतील कुसेगाव येथील श्री.भानोबा देवाची दोन दिवशीय यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात शांतेत पार पडली. मागील वर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली होती. यंत्रा मात्र शासनाने दिलेले नियम अटीवर यात्रेस शासनाने परवानगी दिली होती. 
      त्यामुळे यंदा कुसेगाव येथील ग्रामदैवत श्री.भानोबा देवाची ही यात्रा होणार असल्याने लाखो भाविकांनी भानोबा देव-दानव युध्दांचा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 
 दरम्यान, यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने येणा-या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी पाणी,जेवन,आरोग्य अशा विविध सोयी ठिकठिकाणी उपल्बध करण्यात आल्या होत्या. तर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. चारही बाजून वाहतुकींची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या