सर्पदंश झालेल्या मुलाच्या उपचारासाठी धावून आले गाव

कोल्हारवादी ग्रामस्थांनी घडवले माणुसकीचे दर्शन 



प्रतिनिधी : निरगुडसर 

सातगाव पठार ता.आंबेगाव भागातील कोल्हारवाडी येथील 8 वर्षाचा रुद्र सावंत यास घरासमोर खेळत असताना विषारी मणियार  
जातीचा साप चावल्याने त्यास खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. घरची परिस्थिती खूप गरीब असल्याने रुद्र ला कोल्हारवाडी ग्रामस्थांनी एक हात मदतीचा हेतूने त्याचे उपचार बिल भरले असून बिल भरून उरलेली रक्कम ही इतर खर्चासाठी मदत स्वरूपात दिली आहे.

रुद्र सावंत या लहान मुलास विषारी मणियार साप चावल्याने  नारायणराव येथे  त्यास सर्पतज्ञ डॉ.सदानंद राऊत यांच्या कडे दाखल केले. मात्र गरीब कुटुंबातील मुलगा असल्याने त्याचे वडील यांना  हॉस्पिटलचे  बिल देणे शक्य नव्हते.ही बाब कोल्हारवाडी ग्रामस्थांनी लक्षात घेऊन भाजपा चे जयशिंग एरंडे,माऊली एरंडे ,सोपानराव एरंडे,पोलीस पाटील श्याम एरंडे यांनी पुढाकार घेऊन सातगाव पेप्सी हुंडेकरी ग्रुप यांनी 55 हजार रुपये, सातगाव पठार ग्रुप 51हजार, कोल्हारवाडी ग्रामस्थ 48 हजार , शनशाईन ग्रुप थुगाव 6 हजार रुपये, शिव छावा बैलगाडा संघटना सातगाव पठार 7 हजार अशी एकूण 1 लाख 68 हजार रुपये जमा झाले. मुलाच्या घरची नाजूक आर्थिक परिस्थिती पाहता आणि कोल्हारवाडी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन  डॉ सदानंद राऊत यांनी 35 हजार रुपये बिलात सूट दिली. हॉस्पिटलचे बिल देऊन उरलेले 68,000 रुपये ग्रामस्थांनी मुलाच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यामुळे गरीब कुटुंबाला खूप मदत झाली. कोल्हारवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन लहान रुद्र सावंत यांच्या उपचारासाठी मदत केली आहे. आता रुद्रला उपचार करून घरी सोडले आहे.कोल्हारवाडी ग्रामस्थांनी मदत केल्याने गरीब कुटुंबातील लहान मुलाच्या उपचाराचा खर्च केल्याने ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत असून या कुटुंबाने ग्रामस्थांचे आभार मानले आहे.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या