राज्यस्तरीय स्पर्धेत अमदनगर संघाला २ सुवर्ण तर १० कास्यपदक


श्रीरामपूर प्रतिनिधी - 

येथील संस्कार स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्र्यंबकेश्वर येथील ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमात 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अकराव्या राज्यस्तरीय पंचाकसलाट स्पर्धेत अहमदनगर संघाने 2 सुवर्ण रजत व 10 कास्य पदकावर आपले नाव कोरले स्पर्धेला 34 जिल्हयातील ७०० खेळाडू सहभागी झाले होते. 

यामध्ये अक्षदा गायकवाड (सुवर्ण) प्राजक्ता मांडगे (सुवर्ण) महेश कुराडे (रौप्य) राधिका खरात ( कास्य)आदित्य पाटणकर(कास्य) श्रावणी शिंदे (कास्य) नरेंद्र कुदळे(कास्य) कल्याणी कुंभकर्ण (कास्य) सार्थक शिंदे कास्य) कुंती परभने( कास्य) सार्थक साळवे (कास्य) या खेळाडूंनी पदके मिळवली.

ही स्पर्धा तुंगलगंडा, स्टैंडिंग या चार प्रकारात झाली. स्पर्धेत 3 ते 45 वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विजेत्या खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. पिंचाक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट चा प्रकार असून स्व-संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रभावी मार्शल आर्ट आहे नुकताच या खेळाचा समावेश केंद्र शासनाच्या क" गटाच्या नोकर भरती मध्ये झाला आहे. विजेत्यांना इंडियन पिंचाक सीलात फेडरेशनचे अध्यक्ष त था महाराष्ट्र पिंचाक सिलात चे महासचिव किशोर येवले यांनी पदक देऊन सन्मानित केले.

या यशस्वी खेळाडूंना अहमदनगर पिंचाक सीलाट असोसिएशनचे सचिव प्रवीण कुदळे, प्रशिक्षक- कलीम बिनसाद, अशोक शिंदे, शुभम राऊत, किरण वाघ यांनी मार्गदर्शन केले. तसेच या खेळाडूंचे श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब तोरणे, तानाजी पाटील, संजय नाबदे, केतन खावडिया, गणेश कुलथे, श्रीकांत आरणे, विजय खरात यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या