Breaking News

सभापती पदाला शेळकेनीं न्याय दिला : राहुल शिंदे

जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा 


वाडेगव्हाण:-

पंचायत समिती सदस्यपदी दोन वेळा मिळालेली संधी यामध्ये सभापती पदाचा मिळालेला दोन वेळा कार्यभार यात वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक कामांच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवुन सभापती गणेश शेळके यांनी सभापती पदाला न्याय दिला असे मत जिल्हा परिषदेचे जलसंधारण व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. कुरूंद(ता.पारनेर) येथे पंचायत समितीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे  म्हणाले की सभापती गणेश शेळके यांनी सुपा गटा सह तालुक्यात विविध योजना राबवत विकास कामे केली आहेत. पंचायत समितीच्या  विविध योजनेतुन तालुक्यातील अनेक गावांमध्ये निधी देण्यात आला तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पही अनेक गावांमध्ये देण्यात आले आहेत.

पंचायत समिती स्तरावरील विविध योजनांचा अभ्यास करत सदर योजना गावागावांमध्ये  राबवल्या या योजना राबविल्यामुळे तालुक्यातील  ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावले आहे.

या प्रसंगी सरपंच गणेश मधे, उपसरपंच संतोष कारखिले, रमेश गायकवाड, अशोक कर्डिले, दशरथ शेठ कुलाळ, कैलास कोठावळे, चेतन उबाळे, विकास रुपनर, आनंदा भोसले, सुरेश ढेरंगे, दत्ता शेंडगे, बापू खेमनर, भाऊसाहेब शिंदे, दत्ता चौधरी, दिपक उबाळे, रमेश गव्हाणे, गोपी कांबळे, उबाळे चेअरमन, शिवानी चौधरी, निलेश शेंडगे पांडुरंग शिंदे, ओंकार मावळे, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments