युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा कर्मचाऱ्यांवर करवाईची मागणी

सरपंच खोमणे यांनी केली लेखी तक्रार 


सोमेश्वरनगर  : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला मोठ्या प्रमाणात ग्राहक वैतागले असून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सरपंच रविंद्र खोमणे यांनी बँकेच्या रिजनल ऑफिसला लेखी तक्रार दिली आहे. 

१५ वर्षापुर्वी कोहाळे बुद्रुक गावाला राष्ट्रीयकृत बँकेची शाखा मंजूर झाल्याने तत्कालीन सरपंच सुनिल भगत  यांनी ग्रामसचिवालयाच्या इमारत मधील सुसज्ज ३ गाळे भाडोत्री देऊन बँक परिसरातील ग्राहकांनी सेव्हिंग खाते उघडून ठेवी ठेवाव्यात असे अवाहन केल्याने हजारो ग्राहकांनी हजारोंची ठेवी जमा केल्या होत्या. त्यावेळी अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना दैवत मानून सेवा देत होत्या. बँकेला ग्राहकांचा पाठिंबा पाहून छोटे मोठे उद्योग शेतीसह साखर कारखान्यांना कर्जाचे वाटप केले. परंतू गेल्या ३ वर्षापासून बँकेला ग्राहकांची गरज नसल्यासारखे कर्मचारी वागत आहेत. 

या शाखेत पुरुष बँक मॅनेजर असुन २/३ शिकाऊ कर्मचारी दिल्याने ग्राहकांना हिडीस पिडीस करत अपमानास्पदक वागणूक देतात. ग्राहक कामानिमित्त बँकेत आल्यास आज या उद्या या हे ठरलेले शब्द, एटीएम कधी बंद तर आठवड्यातून १/२ दिवस पैशांचा खडखडाट असतो. यापुर्वी दरमहिन्याला ग्राहकांच्या समस्या मिटींग घेत असे ते आता घेत नाही. मॅनेजर उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना पळवुन लावण्यात पटाईत आहे. 

अशा कामचुकार कामगारांवर कारवाई होऊन त्यांची बदली होण्याच्या मागणीची तक्रार सरपंच खोमणे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या