Breaking News

अष्टविनायक महामार्गावरील अपूर्ण काम ठरतेय जीवघेणे


टाकळीहाजी :

 कवठे येमाई ते शिरूर याअष्टविनायक महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य  पाहायला मिळत आहे.अष्टविनायक महामार्गावरील रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून सुरु असून जेथे पुल असतील तेथील कामे अपुर्ण राहील्याने रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होऊन अनेक जणांचे प्राण  गेले आहेत. कवठे येमाई ते मलठण दरम्यान अनेक ठिकाणी पुलांचे काम अपूर्ण आहे.सदर ठिकाणी योग्य प्रकारे दिशादर्शक व रीफलेक्टर लावले नसल्याने रात्रीच्या वेळेस अंदाज न आल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत.

सध्या या भागात ऊस वाहतुक मोठया प्रमाणावर होत असून या खड्यांमुळे ट्रक, ट्रक्टर पलटी होऊन अपघात होत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी व लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास होऊन अपघातास सामोरे जावे लागत आहे. तसेच या रस्त्याचे काम नित्कृष्ठ रित्या झाल्याने बऱ्याच ठिकाणी तो लगेच ऊखडला आहे. मुजोर ठेकेदारामुळे या रस्त्यावर अनेक अपघात वारंवार घडत  आहे.                                 

  अष्टविनायक महामार्गावर कवठे - पारगाव रस्त्यावरील आरती हॉटेल जवळ दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी आहे. दि. १९ डिसेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर तरुण हे भीमाशंकरला गेले होते. तेथून घरी येत असताना ही घटना घडली. दुचाकीवर हे तिघे जण बसले होते. रस्त्याच्या कडेला पुलाचे काम करण्यासाठी खड्डे करण्यात आले होते, त्यामध्ये पाणी साचले होते, रात्रीचा वेळ असल्याने दुचाकी नेमकी त्या खड्ड्यात जाऊन कोसळली आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.  अजून कीती जणांचे प्राण हा ठेकेदार व आधिकारी घेणार आहे? असा प्रश्न नागरीकांन मधून विचारला जात आहे.

No comments