Breaking : नागरिकांना वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणारे लक्ष्मण किंकर वन शाहिद!


 प्रवीण जमधडे । राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर : तीन दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागातील मोहटा देवी मंदिर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठीच्या चार तासांच्या चित्तथरारक प्रसंगात जीवाची बाजी लावणारे वनमजूर लक्ष्मण गणपत किंकर हे उपचारादरम्यान शाहिद झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किंकर यांच्यासह आठ जण जखमी झाले होते.

राष्ट्र सह्याद्री



 लक्ष्मण गणपत किंनकर वनमजूर म्हणून राहुरी वनपरिक्षेत्रात कार्यरत होते. मोरगेवस्ती येथे एका घराच्या बाथरूममध्ये दडलेल्या बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात बिबट्याने किंकर यांच्यावर हल्ला करून मांडीला चावा घेतला होता. सहकर्मचाऱ्याच्या प्रयत्नामुळे त्यावेळी बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. त्यांच्यावर संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु बिबट्याच्या चाव्यामुळे झालेला संसर्ग किंकर यांच्या शरीरात पसरला आणि त्यामुळे त्यांचा आज बुधवार दिनांक 8 डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

       लक्ष्मण गणपत किंकर यांना वनविभागातर्फे “वन शहीद”म्हणून गणण्यात आले आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या