औरंगाबादमधील बाधितांचा आकडा वाढीच्या दिशेनेच!


 मराठवाड्यातील तीन जिल्हे रुग्णसंख्येत अग्रेसर

औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्यासंख्येने तिसऱ्या दिवशीही हजारांचा आकडा पार केला. औरंगाबादमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. शुक्रवारी तब्बल 1 हजार 149 कोरोना बाधितांची भर पडली. तर मागील 24 तासात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात 512 जणांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील 338 तर ग्रामीण भागातील 174 रुग्ण घरी घरी परतले. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार एवढी आहे.

मराठवाड्यातील रुग्णसंख्या 4 हजारांवरमराठवाड्यात गेल्या 24 तासात 4 हजार 55 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादेत 1149, जालना जिल्ह्यात 284, परभणीत 37, नांदेडमध्ये 719, हिंगोलीत 137, बीडमध्ये 295 रुग्ण, लातूरमध्ये 771 रुग्ण तर उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 323 रुग्ण आढळले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या