५ कोटिंच्या रस्त्याचा कामात भ्रष्टाचार? 'राजद'ची तक्रार


श्रीरामपूर : 
 तालुक्यातील हरेगाव-उंदीरगाव-नाऊर या जवळपास पाच कोटी रुपये खर्चाचे रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसून, थातूरमातुर काम करून 'साबा'चे संबंधित दोषी अधिकारी व 'जगताप इन्फ्रा इंडिया प्रा.ली.' या ठेकेदार कंपनीने शासनाच्या पैशावर डल्ला मारून संगणमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालविला आहे. यासंदर्भात 'राष्ट्रीय जनता दला'चे जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे व इतरांनी 'साबा'चे मुख्य अभियंता तसेच कार्यकारी अभियंता आर आर पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. 'श्रीरामपूर'चे आ. लहू कानडे यांनी पाठपुरावा करून रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. श्रीरामपूर तालुक्यात कामे केल्याचे 'दिखावा' करून 'दर्जाहीन' कामाच्या माध्यमातून'शेळीचे राखण वाघ करतोय..! अशी परिस्थिती श्रीरामपूर मतदारसंघात झाली असल्याची टीका 'राजद'चे जिल्हाध्यक्ष इम्रान शेख व राजेश बोरुडे यांनी केली आहे.


३० ऑगस्ट २०२१ रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषद सदस्य सुधीर तांबे, श्रीरामपूर विधानसभा सदस्य लहू कानडे यांसह अनेकांच्या हस्ते हरेगाव-उंदीरगाव-नाऊर-नाऊर रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला. दरम्यान, डिसेंबर महिन्यात रस्त्याचे काम सुरु झाले. रस्त्याची पाहणी केली असता हे काम इस्टीमेंटप्रमाणे होत नसल्याचे निदर्शनास आल्याने 'राजद'चे जिल्हाध्यक्ष इम्रान शेख व सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे यांनी कार्यकारी अभियंता आर आर पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या