चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ ५ लाखांची मागणी : ५ जणांवर गुन्हा...!

बारामती


:
पीडित विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत तिच्या कुटुंबाकडून पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पीडित विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत व तिच्या कुटुंबाकडून पैशाची मागणी करण्याचा प्रकार ४ मे २०२१ पासून ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत बारामती शहरातील कसब्यात घडला होता. याबाबत पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पती सचिन हरिश्चंद्र बनकर,सासरे हरिश्चंद्र बनकर,सासू छाया हरिश्चंद्र बनकर,दीर प्रशांत हरिश्चंद्र बनकर, जाऊ दिपाली प्रशांत बनकर सर्व. (रा.आर्या अपार्टमेंट,जामदार रोड,कसबा ता.बारामती,जि.पुणे ) यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३२३,४९८,५०४, ५०६ ,३४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत, तिच्या कुटुंबाकडून पाच लाखांची मागणी केली.मात्र सासरच्या लोकांच्या मागण्या विवाहितेने पूर्ण न केल्याने त्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. कित्येकदा पती सचिन मला दारू पिऊन शिवीगाळ करणे, घालून पाडून बोलणे, वेळेवर जेवण करू न देणे, रात्री अपरात्री घराबाहेर काढणे असा त्रास दिला जायचा व मारहाण करायचा असे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हणंटले आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या