Breaking News

वाळू तस्करीतून चापडगावात गोळीबार पोलिस घटनास्थळी दाखल


शेवगाव :
आणि वाळू तस्करी यांचा संबध पुर्वापार सुरू आहे. या वाळू तस्करीतून अनेक वेळा मारामाच्या, खून, जाळपोळ शेवगाव तालुक्यासह जिल्ह्याने पाहिली आहे. याच वाळू तस्करीतून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भर सकाळी 10 वाजता घडली. दोन दुचाकीवरून बाहेरुन आलेल्या चौघांनी भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. शेवगाव तालुक्यातील  गोदावरी नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा चोरीछुपा सुरू असतो. या वाळूच्या तस्करीतून अनेकवेळा दोन गटात मारामाऱ्या, जाळपोळ व खुनासारख्या घटना घडले आहे.  आज शनिवारी सकाळी 10 वाजता चापडगाव येथे बाहेर गावाहुन दोन दुचाकीवर चौघे तरुण आले होते. भर चौकातच गावातील एका तरुणांवर यातील एकाने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. ही गोळी चापडगाव येथील तरुणाच्या हाताला चाटून गेली. तर त्या तरुणांनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने चापडगावसह शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

No comments