Breaking News

अंगणवाडी सेविकेच्या छळप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा


वैजापूर  : 
मुलगी झाली म्हणून अंगणवाडी सेविकेचा छळ करून तिला घराबाहेर काढून दिले. तसेच माहेराहुन एक लाख रुपये आणण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पालखेड येथे अंगणवाडी सेविका म्हणुन कार्यरत असलेल्या जया हिचे येथील संजय भाऊसाहेब शेलार (या. पालखेड) याच्याशी २०१२ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी मुलगी झाल्यावर व दुसरीही मुलगीच झाल्याचा राग धरत सासरची मंडळी त्रास देत होते. घरखर्चासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये.अशी मागणी तिच्या कडे करण्यात आली.तसेच दुसरे लग्न करायचे आहे.त्यामुळे तुझा काटा काढेन अशी धमकी पती संजय शेलार याने दिली. या छळाला कंटाळून जयाने पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. या प्रकरणी जया हिने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती संजय शेलार, विमलबाई भाऊसाहेब शेलार, भाऊसाहेब दगडू शेलार सर्व रा.पालखेड,अनिता विलास खरात व विलास साहेबराव खरात रा.रुई ता.राहता,सुनिता सुनिल रोकडे व सुनिल जनार्दन रोकडे रा.डागपिंपळगाव या सात जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


No comments